Saturday, 21 October 2017

श्री ज्योतिषी बाबा देवस्थान यात्रा
 ३रा श्रावण सोमवार मधील पदयात्रेतील एक क्षण.....
महान तपस्वी श्री.ऋषी ईश्वर भारती बाबा यांचेे तत्व समाजापर्यंत पोहोचावे या उद्देश्याने  तपस्वी ईश्वर भारती बाबा संस्थान, बेलेश्वर ता.जि.बीड हे सार्वजनिक विश्वस्थव्यवस्था अधिनियम १९५० अन्वये स्थापन करण्यात आले. संस्थानद्वारा दरवर्षी बाबाजींचा उत्सव,समाधीसोहळा,शिवरात्री, श्रावणमास तसेच इतर धार्मिक उत्सव साजरे केले जातात. महान तपस्वी श्री ईश्वर भारती बाबा यांचा जन्म बीड जवळील लिंबागणेश येथे झाला बालपणीच परमार्थाची आवड असल्यामुळे लहान वयात घरदार सोडले. १२ वर्षांपर्यंत पायी देवदर्शन घेऊन जंगलात एकांत वासात राहून अन्नाचा त्याग केला त्यावेळी शेष नारायणाची भेट झाली.बेलेश्वर येथे महादेवाच्या तपश्चर्येला सुरवात केली. बेलेश्वर गावात व गावाच्या बाहेर वनात त्यांनी ३ ठिकाणी ३६ वर्षे तपश्चर्या केली.
...

श्री ज्योतिषी बाबा देवस्थान यात्रा  ३रा श्रावण सोमवार मधील पदयात्रेतील एक क्षण.....